अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर ब्रेकींग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी ए. बरालिया यांनी आरोपी दिलीप सखाराम दांगट (वय 51 रा. कात्रड ता. राहुरी) याला दोषी धरले. त्याला भादंवि कलम 376 (2), 323 आणि पोक्सो कायदा कलम 6 प्रमाणे दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.

सदर खटल्यामध्ये अतिरिक्त सरकारी वकील जी. के. मुसळे व मंगेश दिवाणे यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांनी केला होता.

सदर खटल्यामधील पीडित मुलगी फितुर झाली होती. तसेच बचाव पक्षाने पीडित मुलीचा भाऊ याची साक्ष नोंदविली होती. त्यानेदेखील आरोपीच्या बाजुने साक्ष दिली होती. आमची आरोपीविरुध्द काही एक तक्रार नाही, असे साक्षी दरम्यान न्यायालयास सांगितले होते.

दिलीप दांगट याने एका रात्री फिर्यादीच्या समक्ष पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यास फिर्यादीने प्रतिकार केला असता दिलीपने फिर्यादी व तिच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी व गजाने मारहाण केली व घराबाहेर काढुन दिले.

फिर्यादीने वरील झालेल्या सर्व घटनेबाबत दिलीप दांगट विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून दांगटविरोधात भादंवि कलम 376 (2), 494, 323, 504, 506 तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांनी केला व आरोपींविरूध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश श्रीमती माधुरी ए. बरालिया यांचेसमोर झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण 11 साक्षीदार तपासण्यात आले.

न्यायालयासमोर सरकार पक्षाचा आलेला तोंडी साक्षी- पुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच अतिरिक्त सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दिलीप सखाराम दांगट याला भादंवि कलम 376 (2), 323 आणि पोक्सो कायदा कलम 6 प्रमाणे दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button