अहमदनगर

अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक; आणखी ‘ऐवढे’ तोळे सोने आढळले बनावट

अहमदनगर- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणात शनिवारी 17 तोळे बनावट सोने आढळले होते. दरम्यान आज सोमवारी कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी 27 तोळे बनावट दागिणे आढळून आले आहेत. त्यावर 8 लाख 75 हजारांचे कर्ज घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

 

कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी आणखी दोघांचा आरोपींमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे आरोपींची संख्या 39 वर पोहोचली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहर बँकेतील बनावट सोनेतारण कर्ज घोटाळा चर्चेत आहे. तपासाला पोलिसांनी गती दिली आहे.

 

दरम्यान, शनिवारीही 17 तोळे बनावट सोने आढळले होते. त्यामुळे आत्तापर्यंत सुमारे 37 खात्यांमध्ये आठ हजार 981 ग्रॅम म्हणणे जवळपास नऊ किलो बनावट दागिने ठेवल्याचे व त्याद्वारे शहर बँकेची सुमारे 3.25 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button