अहमदनगर

अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरण; न्यायालयाने तिघांचा…

अहमदनगर- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलिसांत दाखल गुन्ह्यातील तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अजय किशोर कपाले (गोल्ड व्हॉल्युअर), ज्ञानेश्‍वर रतन कुताळ व सुनील ज्ञानेश्‍वर आळकुटे यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. दरम्यान दोघांचे जामीन अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. श्रीतेश रमेश पानपाटील व विशाल संजय चिपाडे अशी त्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी मंगळवारी एक कर्ज खात्याची तपासणी केली. यामध्ये 32 तोळे बनावट दागिणे आढळून आले आहेत. त्यावर 10 लाख 70 हजारांचे कर्ज घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पूर्वी तपासणी केलेल्या एका कर्जदाराचेच हे खाते असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये आतापर्यंत शहर बँकेची सुमारे साडेतीन कोटींच्या पुढे फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button