अहमदनगरताज्या बातम्या

Ahmednagar Crime | अहमदनगर जिल्हा हादरला ! भावानेच केला खून..

Ahmednagar Crime :- सख्ख्या भावाला मारहाण करत डोक्यात खोर्‍याने वार करून खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील गोडेवाडीत घडली. या प्रकरणी सुरेश लेंभे, राजाराम उर्फ राहुल लेंभे या पिता पुत्रांना अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे.

आरोपींना पोलिसांनी अटक !
या प्रकरणी सुरेश लेंभे आणि राजाराम उर्फ राहुल लेंभे यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये करत आहे.

माझ्या शेतातून जनावरे घेऊन जायचे नाही…
मयताची पत्नी सोनाबाई मनोहर लेंभे (वय 40, रा. गोडेवाडी, केळी-कोतुळ) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 16 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास शेतातील जनावरे सुरेश लेंभे यांच्या रिकाम्या शेतातून घेऊन जात असताना त्यांनी माझ्या शेतातून जनावरे घेऊन जायचे नाही, असे म्हणत सोनाबाई यांना शिवीगाळ केली.

डोक्यात वार केले आणि …
यानंतर काही वेळाने मनोहर लेंभे हे कामावरून घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सोनाबाई यांनी सांगितला. त्यानंतर मनोहर यांनी भाऊ सुरेश याला जनावरांचा रस्ता अडवल्याचा जाब विचारला.

जाब विचारल्याचा राग आल्याने सुरेश याने मनोहर यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांच्याशी झटापट करत शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असणार्‍या राजाराम उर्फ राहुल लेंभे याने खोर्‍याने मनोहर लेंभे यांच्या डोक्यात वार केले. यामध्ये मनोहर लेंभे यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button