अहमदनगर

Ahmednagar Crime | बस प्रवासादरम्यान दोन महिलांचे दागिणे लांबविले

Ahmednagar Crime : बसमधील दोन प्रवाशी महिलेच्या रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाली. औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर पांढरीपूल (इमामपूर घाट) येथील हॉटेल लेमन ट्री येथे ही घटना घडली.

या प्रकरणी डॉ. आश्‍विनी लक्ष्मण शिंदे (वय 32 कोंढवा, पुणे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या सहप्रवासी रोहिणी आनंद नांदूरकर या बसमधून प्रवास करत होत्या.

पांढरीपूल येथे लेमन ट्री या हॉटेलवर चहा- नाष्टा करण्यासाठी बसच्या खाली उतरल्या असता, त्यांच्या सामानाची बसमधून चोरी झाली. आश्‍विनी शिंदे यांची 43 हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी व पंधराशे रूपये रोख रक्कम

तर रोहिणी नांदूरकर यांचे चार हजार रूपये रोख रक्कम व एटीएम कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड असे महत्वाचे दस्तऐवज चोरीला गेले. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button