Ahmednagar Crime : माजी नगराध्यक्षाकडून भरपेठेत महिलेस बॅटने मारहाण

Ahmednagar Crime : राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांनी त्यांच्या भावासह, पत्नी व मुलास बेदम मारहाण केल्या प्रकरणी अनिल कासार याच्यावर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अक्षय सुनील कासार (वय ३३) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हणले की,दिनांक २४ एप्रिलच्या रात्री आमच्या घरी आले असता त्याच्या सोबत त्याची पत्नी प्रमिला व मुलगा ओंकार हे दोघेही होते.
घरी आल्या आल्या त्यांनी शिवीगाळ सुरू करून माझे वडील सुनील कासार यांना म्हणाला की,मी कोण आहे तुला माहिती आहे का? तू माझ्या विरुद्ध बँकेत अर्ज करून माझे कागदपत्रे मागणी करतो काय असे म्हणाला.
त्यावर वडील सुनील कासार यांनी मला यातील काहीच माहीत नाही असे म्हणतात अनिल कासार याचा मुलगा ओंकार याने बॅटने वडील सुनील कासार यांना मारहाण करण्यास सुरू केली. त्यावेळी मी मध्ये पडलो असता मलाही बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली.
माझी आई शोभा कासार मध्ये पडली असता ओंकार कासार याने डोक्यात बॅट घालून जखमी केले. तसेच अनिल कासार याची पत्नी प्रमिला कासार हिने देखील मारहाण केली.
त्यांनतर अनिल कासार व त्यांची पत्नी प्रमिला यांनी माझ्या वडिलांना म्हणाले की, तुम्हाला सगळ्यांना उद्या बघतो असे म्हणून शिवीगाळ करुन तुमचा काटा करू असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देवून तेथून निघून गेले.
याबाबत अक्षय सुनील कासार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनिल यशवंत कासार, प्रमिला अनिल कासार व ओंकार अनिल कासार (सर्व राहणार जंगम गल्ली, महादेव मंदिराजवळ ) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.चव्हाण हे करत आहे.