Ahmednagar Crime : हेल्मेट गॅग सक्रिय चोरले दोन तोळे

दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी वृध्द महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन ओरबडून नेली. शशिकला यशवंतराव भंडारे (वय 84 रा. स्वाती कॉलनी, बुरूडगाव रोड, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील बुरूडगाव रोडवर ही घटना घडली. फिर्यादी शशिकला भंडारे व मंगल सोमाणी या दोघी बुरूडगाव रोडवरील स्वाती कॉलनीमध्ये पायी फिरत होत्या.
समोरून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादी भंडारे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची दोन पदरी चैन बळजबरीने ओढून तोडून नेली आहे.
दुचाकीवर पुढे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले होते तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात टोपी व पाठीवर बॅग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सोमवारी सकाळी पथकासह घटनास्थळी पाहणी करून आरोपींच्या अटकेबाबत पोलिसांना सुचना दिल्या आहेत.