अहमदनगर

Ahmednagar Crime | व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकली अन्…

हॉटेल व्यावसायिक रघुनाथ एकनाथ मेटे (वय 50 रा. नगर – दौंड हायवे, हनुमाननगर, अहमदनगर) यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील एक लाख 67 हजार 500 रूपयांचा ऐवज लुटला.

नगर तालुक्यातील हातवळण ते रूईछत्तीशी रोडवरील रूईछत्तीशी शिवारात भुजबळ वस्तीजवळ ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बाळासाहेब सायंबर, संदीप सदाशिव सायंबर यांच्यासह चार अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेटे यांनी फिर्याद दिली आहे. मेटे यांचे हातवळण गावात हॉटेल आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून सोमवारी हॉटेल बंद करून घरी जात असताना भुजबळ वस्तीजवळ तीन दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी मेटे यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली. मेटे यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून तलवारीचा धाक दाखविला.

त्यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांच्या खिशातील 70 हजार रूपयांची रोख रक्कम, 37 हजार 500 रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 60 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन असा एक लाख 67 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपस पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button