अहमदनगरलेटेस्ट

Ahmednagar Crime | अंगावर काटा आणणारी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या बहिणीने केला लहान बहिणीचा खून

Ahmednagar Crime :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, सख्या मोठ्या बहिणीने आपल्याच लहान बहिणीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी तब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण नगर-मनमाड महामार्गालगत भन्साळी ट्रॅक्टर जवळ रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी हर्षदा नवनाथ बानकर (वय-16) हिने नुकतीच आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाले होते.

मयत मुलीची मोठी बहीण आरोपी श्रुष्टि नवनाथ बानकर हिचे एका मुलाशी प्रेम संबंध असतांना तिचा मोबाईल आई-वडिलांना पडून दिला होता. तसेच तिचे प्रेम प्रकरण उघडकीस आणले होते.

तसेच आरोपी बहीण घरातून पळून जाण्याच्या तयारीत असतांना मयत बहीण कु. हर्षदा बानकर हिने तिला विरोध केला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी सृष्टी बनकर हिने तिचा दि.30 सप्टेंबर रोजी साडे चार वाजेच्या दरम्यान राहाते घरी ओढणीने गळा आवळून खून केला होता.

मात्र या घटनेचा बनाव करत आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले होते. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत तपास केला असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रुष्टि नवनाथ बानकर हिस अटक केले असून याबाबत कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं 305/2022 भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button