अहमदनगर

Ahmednagar Crime : चहा विक्रेत्याचा कार्यालयातील पैशावर डल्ला; पोलिसांनी लावला छडा

Ahmednagar Crime : कार्यालयात चहा घेवून जाणार्‍यानेच कार्यालयातून रोख रक्कम चोरून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे. चोरी करणारा आरोपी अशोक तुकाराम दळवी (वय 33 रा. एकविरा चौक, सावेडी) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. निलेश विष्णुदास बैरागी (वय 40 रा. श्रीरंगनगर, शेंडीबायपास) यांनी फिर्याद दिली आहे.

गुरूवार, 7 एप्रिल, 2022 रोजी चोरट्यांनी बेलस्टार मायक्रोफायन्सचे कार्यालय फोडून 88 हजार 572 रूपये रोख रक्कम, लॉकर, चेक बुक, रेन्ट अ‍ॅग्रीमेंन्ट व इतर शाखेच्या चाव्या असा 89 हजार 572 रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमंलदार संभाजी बडे यांनी केला.

आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. दळवीकडून 55 हजार 500 रूपये रोख रक्कम, लॉकर असा 56 हजार 649 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान दळवी हा एकविरा चौकात चहाची टपरी चालवत होता. तो दररोज मायक्रोफायन्स कार्यालयात चहा घेवुन जात होता. यातून त्याने कार्यालय फोडून रोख रक्कम व इतर साहित्यांची चोरी केली. चोरलेले पैसे एका बंद पडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ठेवले होते. अंमलदार बडे यांनी तपास करून आरोपी दळवी याला अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button