Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरपुलाच्या बांधकामामुळे अहमदनगर - दौंड रस्त्यावरील वाहतूक बंद..

पुलाच्या बांधकामामुळे अहमदनगर – दौंड रस्त्यावरील वाहतूक बंद..

Ahmednagar News : अहमदनगर ते दौंड रस्त्यावरील नगर- बीड रेल्वे लाईन क्रॉस करणाऱ्या पुलाच्या कामासाठी दि.१४ ते २१ फेब्रुवारी रात्री पर्यंत अहमदनगर ते दौंड रस्त्यावरीलवाहतुक बायपासमार्गे वहवण्यात आलीआहे. तसा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काढला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर ते दौंड रस्त्यावरील नगर- बीड रेल्वे लाईनला ओलांडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरु होत आहे. सदर बांधकामासाठी साईटच्या जवळ मोठमोठे गर्डर वळवण्यात आलेले आहेत.

सदर गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत. हा रहदारीचा रस्ता असल्याने कामादरम्यान अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे बुधवार दि. १४ ते २१ फेब्रुवारपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

यानुसार या कालावधीत अहमदनगर दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात येणार आहे.

कायनेटीक चौकातुन दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणाऱ्या वाहनांकरीता पर्यायी मार्ग कायनेटीक चौक – केडगाव केडगाव बायपास -अरणगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.अरणगाव चौकातुन कायनेटीक चौकाकडे येणाऱ्या वाहनांकरीता पर्यायी मार्ग : अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव कायनेटीक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. पुणेकडुन दौंड रोडला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग – केडगाव बायपास अरणगाव बायपास दौंड रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. तरी नागरिकांनी याबाबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments