अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू !
" शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

शिर्डीत अद्ययावत महसूल भवनासाठी जागा व शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
” शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात खासदार लोखडे व आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा विभाजनाची मागणी केली. या पार्श्वभूमीवर बोलताना विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे सूतोवाच मंत्री विखे पाटील यांनी केले.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, संस्थानचे सीईओ पी शिवा शंकर, जि.प.चे सीईओ आशिष येरेकर,’महानंदा’चे अध्यक्ष राजेश परजणे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, कैलास कोते,
सचिन तांबे, नीलेश कोते, डॉ. किसन गाडेकर आदींची उपस्थिती होती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.
शेती महामंडळाची पाचशे एकर जागा एमआयडीसीसाठी मंजूर केली आहे. पुढील सहा महिन्यांत या कामाला गती येईल. येथे उद्योग उभारणीसाठी रिलायन्स व महेंद्रा अॅण्ड महेंद्रासारख्या उद्योगांशी तसेच आयटी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. यातून हजारो कुशल- अकुशल तरुणांना रोजगार मिळेल,
असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आधुनिक तंत्रज्ञान वापरून महसूल विभागाच अधिकाधिक काम ऑनलाइन, पारदर्शी, जलद व मानवी हस्तक्षेपमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले, शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे सहा तालुक्यांतील जनतेची नगरला दूरवर जाण्याची पायपीट थांबेल,
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खासदास सदाशिव लोखंडे यांनी जिल्हा विभाजन व्हावे, नेवासे तालुका शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत घ्यावा व तळेगाव येथे फाइव्ह स्टार एमआयडीसी उभारण्याची मागणी केली. प्रास्ताविकात बोलताना कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर,
संगमनेर, अकोल व राहुरी या सहा तालुक्यांतील ६६३ गावांना कार्यालयाचा लाभ होईल, असे सांगतानाच येथे कोणती कामे होतील. हेही विशद केले.
महसूलमंत्र्यांमुळे या विभागाचे मनोबल बळकटीकरण होत असल्याचे ते म्हणाले, यावेळी आमदार आशुतोष काळे, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटी बाळासाहेब कोळेकर यांनी आभार व्यक्त केले.
सहा तालुक्यांना होणार लाभ
शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले राहुरी या सहा तालुक्यातील ६६३ गावांना लाभ होणार आहे. यामुळे या भागातील नागरीकांना नगरला येण्याची गरज राहिली नाही.