अहमदनगरताज्या बातम्या

Ahmednagar Murder News : अहमदनगर जिल्हा हादरला ! वरमाई म्हणून मिरणारी आई मुलाची हळद फिटताच देवाघरी…

Ahmednagar Murder News : माझ्या घरी शुभ कार्य आहे, तुम्ही येथे वाद करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून पत्नीचा खून केला तसेच चुलते यांना जखमी केले आहे.

सोमवारी दुपारी एक वाजता कीर्तनवाडी येथे ही घटना घडली. या घटनेत भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुशाला राजेंद्र कीर्तने (वय ४३ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मयत महिलेचा मेहुणा व त्याचा मुलगा, असे दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी कि, सुशाला कीर्तने यांच्या मुलाचा रविवारी तिसगाव तेथे विवाह झाला. सोमवारी बडेवाडी येथे कार्यक्रमात शहादेव धायतडक व बाळासाहेब शिरसाट यांच्यात किरकोळ वाद झाला.

बाळासाहेब शिरसाट हा सुशालाचा भाऊ आहे. तो बडेवाडी येथे वाद झाल्यानंतर कीर्तनवाडी येथे आला . त्यानंतर सुशाला कीर्तने यांचा मेहुणा शहादेव धायतडक , शुभम धायतडक व शुभमचे चार सहकारी, असे सहाजण कीर्तनवाडी येथे तीन मोटारसायकलवरून आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारे होती.

राजेंद्र कीर्तने यांच्या घरी पुन्हा वाद सुरू झाला. या वेळी राजेंद्र कीर्तने, सुशाला कीर्तने व भागवत कीर्तने वाद सोडविण्यासाठी मध्ये पडले. या वेळी सुशाला हिच्या डोक्यात शुभम धायतडक याने दांडक्याने जोरात फटका मारला. ती जमिनीवर पडली व बेशुद्ध झाली तर धनाजी नामदेव कीर्तने हे जखमी झाले आहेत.

यातील चौघेजण पळून गेले. त्यानंतर शहादेव व शुभम धायतडक यांना ग्रामस्थांनी पकडून ठेवले. सुशाला हीस उपचारासाठी खरवंडी व त्यानंतर पाथर्डी येथील खासगी दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मयत महिलेचे पती राजेंद्र कीर्तने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजीत आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक रा. धायतडकवाडी, संदीप बाळासाहेब शिरसाट (पिंपळगाव टप्पा), सोमनाथ गणपत घुले (शेकटे) यांच्याविरुध्द पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिस तातडीने की तनवाडी येथे पोहचले.

ग्रामस्थांनी पकडून ठेवलेले शहादेव धायतडक व शुभम धायतडक रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक अजित पाटील यांनी पाथर्डी पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, कौशल्य रामनिरंजन वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

वाघ तपास करीत आहेत. मयत सुशाला राजेंद्र कीर्तने हिच्या मुलाचे कालच लग्न झाले होते. आज धायतडकवाडी येथील शहादेव धायतडक, शुभम धायतडक व त्यांचे चार सहकारी कीर्तनवाडी येथे गेले.

तेथे वाद सुरू असताना मयत सुशाला कीर्तने ही वाद सोडविण्यासाठी मध्ये गेली होती. तेथे तिचा मृत्यू झाला. काल वरमाई म्हणून मिरणारी सुशीला कीर्तने सोमवारी मुलाची हळद फिटताच मयत झाल्याने कीर्तनवाडीच्या ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button