अहमदनगर जिल्हा हादरला ! ‘त्या’ युवकाचा मृत्यू… परीसरात शोककळा

नेवासा तालुक्यातील चांदा येथील कर्डीले वस्तीवर झालेल्या भयानक दरोड्यात गंभीर जखमी झालेल्या ओंकार गंगाधर कर्डिले (वय २१) या युवकाच नगर येथील दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्याच्या निधनाच वृत्त समजताच चांदा आणि परीसरात शोककळा पसरली आहे .
गावातील व्यापाऱ्यांनी गाव बंद ठेवुन श्रध्दांजली वाहिली. मुळा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक गंगाधर नामदेव कर्डीले यांचा ओंकार हा मुलगा होता. कालच्या घटनेत कर्डिले हे सुद्धा जखमी झाले असून
नगर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ओंकार कर्डिले यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर चांदा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सदर घटनेची माहिती नामदार शंकरराव गडाख यांना समजताच त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या.
तसेच नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुनीता ताई गडाख यांनी कर्डिले कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला.