अहमदनगरताज्या बातम्या

अहमदनगर जिल्हा हादरला ! लॉजमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

मुंबई येथील एका इसमाचा शहरातील एका लॉजमध्ये कुजलेला अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला आहे. या इसमाचा मूत्यू कशामुळे झाला याबाबत तर्क वितर्क लावले जात होते.

श्रीरामपूर शहरातील सूर्या लॉजमध्ये बोरीवली मुंबई येथील उमर मेहबूब शेख (वय ५२) हा इसम १५ मार्च २०२२ रोजी लॉजमध्ये आला होता.

मात्र तीन दिवसापासून हा इसम बाहेर आलाच नाही. या रूममधून कुजलेला असा वास येवू लागल्याने लॉजचे मालक यांनी काल सकाळी श्रीरामपूर पोलिसांना याबाबची माहिती दिली.

पोलिसांनी या लॉजमध्ये येवून रुमचा दरवाजा तोढडून तपासणी केली असता त्याच्या रूममध्ये औरंगाबाद येथील कमाल नयन बजाज हॉस्पिटलची फाईल आढळून आली.

त्याव्यतिरिक्त दुसरे काही आढळून आले नाही. मात्र याबाबतची माहिती देण्यास लाॅज मालक व पोलिसांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.

वैद्यकीय अधिका-यांनी मृतदेहाची तपासणी केली. त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संफर्क होवू शकला नव्हता. मॄतदेहाची अवस्था खूपच विचित्र झालेली होती. लाॅज परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गधी वास सुटला होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button