अहमदनगर

अहमदनगर जिल्हा हादरला ! पत्नीची धारधार हत्याराने हत्या…

पत्नीवर कायम वेगवेगळे संशय घेऊन नवर्‍याने आपल्या पत्नीची धारधार हत्याराने हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथे दि. 19 मे 2022 रोजी रात्री 8 वाजण्यापुर्वी घडली.

त्यानंतर पतीने घराला कुलूप लावुन धुम ठोकली आणि त्यानंतर रात्रभर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. जेव्हा मुलाने दुसर्‍या दिवशी कुलूप तोडून ही घटना पाहिली तेव्हा घडला प्रकार उघड झाला.

यात रंजना जगन्नाथ आडे (वय42, रा. शेलविहिरे) या महिलेचा मृत्यु झाला आहे. तर मुलाने दिलेल्या फिर्यादीनंतर जगन्नाथ भागा आडे (रा. शेलविहिरे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवार दि. 19 मे 2022 रोजी जालिंदर आडे (वय 26) हा घरातून कामासाठी बाहेर निघाला होता. तेव्हा त्याच्या आई वडिलांमध्ये वाद सुरू झाले.

अर्थात यांच्या सततच्या वादाला हा देखील कंटाळला होता. वडिलांचे आईला मारहाण करणे, शंका घेणे, शिविगाळ दमदाटी करणे हे नेहमीचे झाले होते. त्यामुळे, जालिंदर याने दोघांना समजून सांगितले आणि तो घराबाहेर पडला.

तेव्हा त्याचे वडिल आईला म्हणत होते की, आज तुझे कामच करतो, आज तुझा बेत पाहतो, तुला मारुनच टाकतो. त्यावेळी त्याने पुन्हा दोघांना समज दिली आणि तो कामाला उशिर झाल्यामुळे निघुन गेला.

त्यानंतर दिवसभर काम केले आणि रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घरी आला असता त्याला घराला कुलूप दिसले. यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केेला. घरात प्रवेश केेल्यानंतर पडवित डोकावले असता तेथे त्याच्या आईचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेला होता.

काहीतरी कडक व धारधार हत्याराने आईची हत्या करण्यात आली होती.दरम्यान, आचानक आईचा रक्तरंजित मृतदेह पाहुन मुलाने टाहो फोडला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button