अहमदनगर

अहमदनगर जिल्हा हादरला ! भावाची कुर्‍हाड घालून हत्या…

दारू पिऊन त्रास देणार्‍या भावाच्या डोक्यात सख्ख्या भावाने कुर्‍हाड घालून हत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे.

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे मंगळवार दिनांक 17 मे रोजी पहाटे दोन वाजता अमोल अरुण लोखंडे याने आपला सख्खा भाऊ राहुल अरुण लोखंडे, वय 25 वर्षे याच्या डोक्यात कुर्‍हाड घालून खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पिंपळगाव फुणगीचे पोलीस पाटील संजय फुणगे यांनी राहुरी पोलिसात अमोल लोखंडे याच्या विरोधात 302 प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटना घडल्याची माहिती कळताच घटनेच्या ठिकाणी मध्यरात्री पोलीस पथकाने भेट देऊन आरोपीस ताब्यात घेऊन गजाआड केले.

मयत राहुल अरुण लोखंडे हा नेहमीच दारुच्या नशेत त्याच्या घरच्या लोकांना शिवीगाळ करुन मारहाण करत असे. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळुन त्यास त्याचा मोठा भाऊ अमोल याने वैतागून कुर्‍हाडीने डोक्यात घाव घालुन जिवे ठार मारले. पोलीस पाटील फुणगे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button