अहमदनगरताज्या बातम्यापाथर्डी

अहमदनगर जिल्हा हादरला ! विहिरीत आढळले ४ मृतदेह

पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव हद्दीतील दीपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहिरीत चार मृतदेह आढळले आहेत. पोल्ट्री फार्मवर कामासाठी आलेल्या कुंटुबातील एक महिला, तिचा एक मुलगा व दोन मुली असे चौघांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत.

पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. चौघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दीपक गोळक यांचा माळीबाभुळगाव हद्दीत फ्लाईंगबर्ड शाळेच्या पाठीमागे पोल्ट्रीफार्मचा उद्योग आहे. तेथे पाच कुटुंबे व इतर पाचजण राहतात. त्यातील एक कुंटब धम्मपाल सांगडे व त्याची पत्न श्री कांचन सांगडे, मुलगा निखिल सांगडे, मुलगी निषिधा व संचिता, असे राहत होते.

Advertisement

धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. या वेळी इतरांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. झोपल्यानंतर पुन्हा पती- पत्नीमध्ये वाद झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी पोल्ट्रीफार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला असता, निषिधा धम्मपाल सांगडे (वय-दीड वर्षे) हिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला.

पोल्ट्रीफार्मचे चालक दीपक गोळक यांना माहिती मिळताच त्यांनी.पोलिसांत खबर दिली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, सुरेश बाबर, कृष्णा बडे, असे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. विहिरीत तीस ते पस्तीस फूट पाणी होते. वीजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसले.

तीन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे (वय २६ वर्षे), निखिल, धम्मपाल सांगडे ( वय ६ वर्षे), संचिता धम्मपाल सांगडे (वय ४ वर्षे), असे तिघांचे मृतदेह सापडले.

Advertisement

कांचन व तिचे तिनही मुले विहिरीत मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी कांचनचा पती धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. चौघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पोलिसघटनेचा तपास करीत आहेत.

धम्मपाल सांगडे (वय ३० वर्षे), हा करोडी, ता. हादगाव, जि. नांदेड येथील मूळ रहिवाशी असून, पत्नी कांचन, एक मुलगा व दोन मुली अशांना घेऊन दीपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीने काम करीत होता.

धम्मपाल हा व्यसनी असल्याचे पोलिस तपासात समजले आहे. पोलिसांनी धम्मपालला ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचे नातेवाईक आल्यानंतरच पुढील कारवाई होईल.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button