अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर ब्रेकिंग : पन्नास लाख रुपयांची बस जाळून खाक !

अहमदनगर जिल्ह्यामध्ये  बेवारस उभी असलेली तेलंगणा राज्यातील वातानुकुलीत लक्झरी बस क्रमांक टि.एस.12 यु.ए.7374 अचानक आग लागल्याने अवकाशात धुराचे प्रचंड लोट उसळले होते.शिर्डी शहरातील पानमळा परिसरात ही घटना घडली आहे. 

सदर घटनेची माहिती समजताच शिर्डी नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र बस पुर्णतः जळून खाक झाली असून साधारणपणे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान शिर्डी शहरातील पानमळा परिसरात बेवारस उभी असलेली लक्झरी बस क्रमांक टि.एस.12 यु.ए.7374 ला शुक्रवार दि.25 रोजी सकाळी पाऊणेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे पेट घेऊन भिषण आग लागली.

यावेळी वार्डातील भाजपचे उपशहराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी शिर्डी नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाला कळवले.त्यानंतर अग्निशमन बंब तसेच शिर्डी कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी आटोक्यात प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत बस पुर्णतः जळून खाक झाली होती.

सदरची बस पुर्णपणे जळाल्याने साधारणपणे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.यावेळी आजुबाजुला रहिवासी वस्ती नसल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. बसला आग लागल्याची वार्ता समजताच अनेकांनी धाव घेतली.

यावेळी जवळपास राहात असलेल्या रहिवाशांनी सांगितले की, सदरची लक्झरी बस गेल्या तिन वर्षापासून शिर्डी नगरपंचायतच्या हद्दीत खाजगी मालकाच्या जागेत चांगल्या अवस्थेत उभी होती. सदरची बस कोणत्या कारणाने पेटली कि पेटवण्यात आली याबद्दल तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button