Ahmednagar Breaking : अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघात ! दोघांचा मृत्यू

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाव असलेल्या धोकादायक वळणावर सोमवार (दि. १९) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चारचाकी दुभाजकाला आदळून अपघात झाला.
या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. सुफियान समीर शेख (वय-२८), व रेहान अस्लम शेख (वय २०, दोघे रा. कोंढवा, पुणे) असे या अपघात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी, सुफियान समीर शेख,
रेहान अस्लम शेख व अन्य एकजण असे तिघेजण (एम. एच. १२ डी. ई. ६२८०) या चारचाकीतून पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. यांचे वाहन उड्डाणपुलावरील चांदणी चौकजवळ आले असता येथील वळणाचा चालकाला अंदाज आला नाही.
चारचाकी थेट दुभाजकाला जावून आदळली. या अपघातात सुफियान व रेहान या दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, नगरच्या उड्डाणपुलावर यापूर्वीही अपघात झाला होता.
त्या अपघातात फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तिसन्य दिवशीही अपघाताच्या घटना घडल्या होत्या.
सुदैवाने त्या अपघातात कोणीही मृत्यूमुखी पावले नाही. उड्डाणपुलावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.