अहमदनगरबाजारभाव

Ahmednagar Kanda Price : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला हा भाव …

Ahmednagar Kanda Price :- राहाता बाजार समितीत काल सोमवारी लूज कांद्याला प्रतिक्विंटल 1252 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त 6341 रुपये इतका मिळाला.

राहाता बाजार समितीत काल 185 वाहनांद्वारे कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1252 रुपये, कांदा नंबर 2 ला 550 ते 900 रुपये, कांदा नंबर 3 ला 100 ते 500 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळिंबाच्या 609 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 111 रुपये तर जास्तीत जास्त 150 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला कमीत कमी 6300 रुपये, जास्तीत जास्त 6341 रुपये तर सरासरी 6325 रुपये भाव मिळाला. हरबरा कमीत कमी 4085 रुपये, जास्तीत जास्त 4151 रुपये तर सरासरी 4120 रुपये भाव मिळाला.

गहू कमीत कमी 2150 रुपये, जास्तीत जास्त 2180 रुपये तर सरासरी 2165 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button