अहमदनगरलेटेस्ट

Ahmednagar Murder | अहमदनगर जिल्हा हत्याकांडाने हादरला ! रामनवमीच्या दिवशी सकाळी दोघांची हत्या…

Ahmednagar Murder :- रामनवमीच्या दिवशी सकाळी दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे,

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या बलराम कुदळे,वय 40 वर्ष या नाराधम माणसाने

त्याची पत्नी व चार वर्षाचा मुलगा या दोघांची आज रामनवमीच्या दिवशी सकाळी हत्या केली.

याबाबत अधिक माहिती अशी की,बलराम याने घरगुती वादातून त्याची पत्नी अक्षता,वय 35 वर्ष हिच्या डोक्यात कुदळीच्या वार करून तिची हत्या केली.

तसेच मुलगा शिवतेज,वय चार वर्ष याला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास देवुन मारले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बलराम कुदळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button