अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ४० विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले ! पालकांमध्ये भीतीचं वातावरण

Ahmednagar News :- रशिया आणि यूक्रेनमधील संघर्ष तीव्र झालाय. रशियाने यूक्रेनच्या किव शहरापर्यंत आपलं सैन्य घुसवलं आहे. तसंच रशियाकडून यूक्रेनवर मिसाईल हल्ले केले जात आहेत. अशावेळी भारतातील अनेक कुटुंबांना आपल्या मुलांची चिंता लागून राहिली आहे.

कारण भारतातील अनेक विद्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी आहेत. एकट्या अहमदनगरचेच जवळपास 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

40 विध्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भारत सरकारला मुलांना सुखरुप परत आणण्याचं आवाहन केलंय. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावरील चिंतेचं सावट स्पष्ट दिसून येत आहे.

यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भावना
बोलताना एक पालक म्हणाले की, ‘माझा मुलगा आहे तिकडे. तो सेकंड इयरला आहे. तो म्हणतोय की सध्या इथे परिस्थिती चांगली आहे, तुम्ही काही काळजी करु नका. पण आमची अपेक्षा इतकीच आहे की तो यूक्रेनमधून सुखरुप यावा, त्याला भारतात लवकरात लवकर आणण्यात यावं. तिथले लोक त्यांना मदत करत आहेत. सगळे एकत्र राहत असून काही काळजी करु नका, असं तिथले लोक आम्हाला सांगत आहेत’.

एक महिला पालक म्हणाल्या की, ‘माझा मुलगा एमबीबीएसच्या सेकंड इयरला झाप्रोझियामध्ये आहे. आज त्याची फ्लाईट होती पण किव एअरपोर्टवर सकाळी काही बॉम्ब ब्लासिंग झाली अशा त्याचा सकाळी फोन आला होता. त्यामुळे त्यांच्या फ्लाईट रद्द झाल्या आहेत.

सर्व मुलांना म्हणजे त्यांची जी बॅच आहे त्यांना किव शहरात त्यांच्या विद्यापीठाने बसेसची व्यवस्था केली आहे. कारण आता यूक्रेनमध्ये सर्वकाही बंद झालं आहे. ते थोडेसे चिंतित आहेत पण त्यांच्या विद्यापीठात गेल्यामुळे ते सेफ राहतील. आताच माझ्या मुलाशी माझं बोलणं झालं, तो सध्या किव बस स्टॉपवर आहे आणि बसची वाट पाहत आहे’.

तर ‘माझा मुलगा यूक्रेनमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याच्याशी बोलणं होतं. तो म्हणतो की आम्ही ठीक आहोत. पण आम्हाला चिंता लागून राहिली आहे. मुलांनी भारतात परत यावं यासाठी सरकारनं तातडीने पावलं टाकावीत’, असं आवाहन एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button