अहमदनगर

Ahmednagar News: गर्भपात गोळ्या जप्त प्रकरण; आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

एमआयडीसी येथे एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यात गर्भपाताच्या नऊ हजार गोळ्या जप्त केल्या होत्या.

या प्रकरणी सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांच्या फिर्यादीवरून श्रीराम एजन्सीचा मालक नितीन बोठे याच्यासह आयव्हीए हेल्थ केअरच्या सर्व संचालकांविरूद्ध एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपी नितीन बोठे याच्या घराची झडती घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. घर झडतीची परवानगी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. दरम्यान बोठे पसार झाला असून अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून बोठे पसार झाला आहे. त्याच्या घराची झडती घेण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच घराची झडती घेतली जाईल, असे आठरे यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या औषध निर्माती कंपनीने गोळ्यांचा पुरवठा केला होता, त्या कंपनीला औषध प्रशासनाकडुन नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीकडून कोणत्या मेडिकल एजन्सीला किती गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला, याची माहिती मागविण्यात आल्याची माहिती औषध निरीक्षक जावेद शेख यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button