Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : आश्वी येथे नागरिकांनी रात्र जागून काढली

Ahmednagar News : आश्वी येथे नागरिकांनी रात्र जागून काढली

Ahmednagar News : आश्वी व परिसरातील गावांमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या खिडक्या, दरवाजे, पत्रे हादरली, काही मिनिटांच्या अंतराने मोठ्या आवाजासह धक्के जाणवत वीजपुरवठा खंडित झाला.

त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट झाली. भूकंपाच्या भीतीने अनेकांची धांदल उडाली. अनेकांनी थंडीच्या कडाक्यात रात्र घराबाहेर जागून काढली.

मंगळवारी रात्री नऊ वाजण्याचा सुमारास संगमनेर तालुक्याचा पूर्वभागातील आश्वी बदक, आश्वी खुर्दसह अनेक गावांमध्ये मोठे आवाज होत लागोपाठ सात ते आठ धक्के जाणवले. यावेळी दरवाजे, खिडक्या, पत्रे वाजल्याने अनेकांची भीतीने धांदल उडाली.

त्यातच बाभळेश्वर येथील महापारेषण यार्डमध्ये ब्रेकर पोल फुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने भीतीत भर पडली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा बंद असल्याने अनेकांनी भर थंडीच्या कडाक्यात रात्र जागून काढली. बुधवारी सकाळी अनेकांनी आपल्या घराची पाहणी केली असता घरांना तडे गेल्याचे आढळून आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments