Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : कंटेनरने उडवले, एकाच कुटुंबातील चौघे ठार, अहमदनगर मधील 'या'...

Ahmednagar News : कंटेनरने उडवले, एकाच कुटुंबातील चौघे ठार, अहमदनगर मधील ‘या’ गावावर शोककळा

Ahmednagar News : तालुक्यातील वडगाव सावताळ येथील पवार कुंटुंबियांच्या मोटार सायकलला कंटेनरने जोराची धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या मोटरसायकल वरील एक जण जखमी झाला आहे.

या अपघातात शेतमजूर अनिल बाळासाहेब पवार (वय २८) सोनाली अनिल पवार (वय २२) माऊली अनिल पवार (वय ११) व एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी : इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने पुढे चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून चिरडले.

मोपेड दुचाकी (क्र. एम..एच.१६ सी.बी. ५२०३) तसेच दुसरी दुचाकी ( क्र. एम.एच. १६ ए.व्ही. १९३१) या गाड्यांना पाठीमागून जोराची धडक देण्यात आल्याने भीषण अपघात घडला.

यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकी वरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल ता.नगर) हे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. मोटार सायकलवर असलेले अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२),

माऊली अनिल पवार (वय ११) व एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

सदर कुटुंब हे पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील रहिवासी असून नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे कांदा काढणीच्या कामासाठी एक ते दीड महिन्यापासून नगर तालुक्यात होते.

एकाच वेळी वडगाव सावताळ येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments