Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : हृदयद्रावक ! तारेच्या घर्षणाने उसाच्या ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह, चालकाचा...

Ahmednagar News : हृदयद्रावक ! तारेच्या घर्षणाने उसाच्या ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह, चालकाचा जागीच मृत्यू, ट्रकही पेटला

अपघाताच्या घटना या तशाही दुर्दैवीच. अपघाताने एखाद्या जीवावर संकट कोसळणे, अगदी जीवावर बेतने या गोष्टी अत्यंत हृदयद्रावी असतात. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या विद्युत वाहिनीला उसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला तर चालक जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या खांबे – वरवंडी रस्त्यावर घडली. चालक संतोष मोटे यांना शॉक लागला. यात ते जागीच गतप्राण झाले. या चालकाचा हा शेवटचा प्रवास ठरला. मोटे यांच्या कुटुंबियांवर यामुळे शोककळा पसरली आहे.

विद्युत वाहिनीला उसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला तर चालक जागेवर ठार झाला होता. शेरी चिखलठाणवरुन एमएच १४ बीजे २२५१ या क्रमांकाची ट्रक ऊस भरुन संगमनेर साखर कारखान्याकडे जात असताना खांबे-वरवंडी शिवेजवळील रस्ता क्रॉस करुन गेलेल्या विद्युत वाहिनीशी उसाने भरलेला ट्रकचे घर्षण झाले.

त्यामुळे संपूर्ण ट्रकवर करंट उतरुन उसाच्या ट्रकने पेट घेतला. चालक संतोष मोटे हे जागेवर शॉक बसून मृत झाले. ही खबर वाऱ्यासारखी पसरल्याने संगमनेर साखर कारखान्यामधून तातडीने अग्नीशामकला पाचरण करण्यात आल्याने पुढील होणारे मोठे नुकसान टळले.

परंतु चालक संतोष मोटे हे जागेवरचं मृत झाले. विद्युत वाहीनीमुळे मोठ्या वाहतूकदारांना मोठा त्रास होत आहे. तेथे असणाऱ्या झाडा-झुडपामुळे ताराही लक्षात येत नाहीत असे येथील लोक सांगतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments