Ahmednagar News : लग्न करून केला मी गुन्हा; २०२४ मध्ये राष्ट्रवादीच पुन्हा ! नवरदेवाने विवाहात नाव घेताना…

Ahmednagar News :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील एका नवरदेवाने नवरीचे नाव घेताना आपल्या उखाण्यातून चक्क राष्ट्रवादीचा पक्षावरील आपले प्रेम दाखवत पक्षाचेच नाव घेतलं आहे.
पक्षाच्या प्रचारार्थ अनेक पक्षांनी आपल्या पक्षाचे गीत तयार केले आहे. यामधे प्रामुख्याने सध्या सर्वत्र आवाज कुणाचा.. आवाज जनतेचा.. दाही दिशांतून घुमला.. राष्ट्रवादी पुन्हा.. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गीत विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकावयास मिळत आहे.
ग्रामीण भागात खेडोपाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जनमाणसांत आपल्या पक्षाची ध्येय धोरणे बिबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मंगळवारी (दि. ९ मे) रोजी कान्हूर पठार ( ता. पारनेर) येथे विवाहा समारंभात याची विनोदात्मक प्रचिती दिसून आली
देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष प्रतिक वाघमारे यांनी आपल्या विवाहप्रसंगी मित्र व नवरीकडील करवल्यांच्या आग्रहाखातर भाजीत भाजी मेथीची असे नाव घेतले.
मात्र त्यावर समाधान न मानता उपस्थित मित्र परिवाराने ऐकू नाही आले, असे म्हणत पुन्हा नाव घ्यायला लावले. यावेळी मात्र नवरदेव प्रतिकने राष्ट्रवादीचा प्रचार व प्रसार करताना ‘लग्न करून केलाय मी गुन्हा, अनुराधाचे नाव घेतो २०२४ ला राष्ट्रवादी पुन्हा असे नाव घेताच टाळ्यांच्या कडकडाटात एकच हशा पिकला.
राष्ट्रवादीच्या गीताचा उखाण्यातून केलेला वापर विशेष चर्चात्मक ठरला. पारनेरचे आ. नीलेश लंके, माजी आ. राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, कुकडीच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप, पंचायत समितीच्या माजी सदस्य कल्याणी लोखंडे आदींनीही या उखाण्याची दखल घेत नवरदेवाचे कौतुक केले.