Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : शिर्डी लोकसभेसाठी मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळावे

Ahmednagar News : शिर्डी लोकसभेसाठी मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळावे

Ahmednagar News : अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज आहे, हे लक्षात घेऊन निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी अॅड. नितीन पोळ यांनी केली.

‘मिशन शिर्डी लोकसभा’ या नावाने मतदारसंघातील मातंग समाजातील सामाजिक, राजकीय, पदाधिकारी व नोकरदार यांनी मिशन सुरू केले आहे.

मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत बैठका घेतल्या जात आहेत. रविवारी कोपरगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

यावेळी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना भेटून उमेदवारी मागण्यात येणार आहे.

यावेळी अॅड. पोळ म्हणाले की, सन २००९ शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र, तीन लोकसभा निवडणुकीत लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मातंग समाजाकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल होते. या बैठकीस विनोद राक्षे, सोमनाथ म्हस्के, अशोक आल्हाट, ज्ञानेश्वर राक्षे, उत्तमराव शेलार,

मंज्याबापू साळवे, सुखदेव जाधव, संतोष गायकवाड, पोपट सरोदे, जगन्नाथ आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय त्रिभुवन यांनी केले. अकोले, संगमनेर, राहुरी, राहता, श्रीरामपूर, नेवासा येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments