Home अहमदनगर Ahmednagar News : शिवीगाळ केली म्हणून केला खून

Ahmednagar News : शिवीगाळ केली म्हणून केला खून

0
73
Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरातील शेंडी बाह्यवळण रस्त्यावरील तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी राहुरी येथून २४ तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद केले.

शिवीगाळ केल्याने खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली, असे पोलिसांनी सांगितले.

बंटी ऊर्फ किरण प्रकाश पाटोळे (वय २२), रोहित प्रकाश पाटोळे (वय २१, रा. दत्तनगर वडगाव गुप्ता, ता. जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, १५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सात वाजता शेंडी बाह्यवळण रस्त्यावरील चिकनच्या दुकानासमोर शुभम अशोक सोनवणे व आरोपी रोहित पाटोळे यांच्यामध्ये चेष्टा मस्करीवरून शिवीगाळ झाली. त्यानंतर बंटी पाटोळे याने सोनवणेवर वार केले.

अनिकेत अशोक सोनवणे (वय २४, रा. फोर्जिंग कॉलनी शेंडी बाह्यवण रस्ता, वडगाव गुप्ता) यांच्या फिर्यादीवरून किरण पाटोळे, रोहित पाटोळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली, की वरील गुन्ह्यातील आरोपी राहुरीच्या दिशेने पळून गेले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी येथे सापळा लावून त्यांना पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आम्हाला शुभम अशोक सोनवणे याने शिवीगाळ केल्याचा राग धरून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले, असे त्यांनी सांगितले.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक दीपक पाठक, पोलिस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार सांगळे, नितीन उगलमुगले, साबीर शेख, राजेंद्र सुद्रिक, महेश बोरुडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास, राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here