अहमदनगर

Ahmednagar News : नगरकरानो इकडे लक्ष द्या ! कटिंग व दाढीच्या दरात झालीय इतकी वाढ…

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक संघटनेच्या बैठकीत 15 मे 2022 पासून कटिंग व दाढीच्या दरात भाववाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत सलूनच्या दरवाढी संदर्भात निर्णय घेण्यात आला.

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, त्याचबरोबर सलून मटेरिअलचे वाढलेले दर यामुळे सलून चालक मेटाकुटीस आले आहेत. सलून निगडित मटेरियल, वीज बिल

अशा अनेक महागाईच्या संकटाशी तोंडमिळवणी करण्यासाठी व तसेच वाढत असलेली महागाई व सलूनचे दर यात ताळमेळ बसत नसल्याने नाईलाजास्तव दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार झालेल्या बैठकीत कटिंगसाठी 130 रुपये व दाढीसाठी 70 रुपये दर येत्या 15 मे 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. सर्व सलून व्यावसायिकांनी एक सारखे दर आकारावेत आणि ग्राहकांनीही सहकार्य करावे असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button