Home अहमदनगर Ahmednagar News : विकास कामांनाच प्राधान्य : खा. सुजय विखे

Ahmednagar News : विकास कामांनाच प्राधान्य : खा. सुजय विखे

0
50
Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News : निवडणूक अजून लांब आहे. कोण विरोधक आहे याचीही आपल्याला कल्पना नाही. कोण चर्चेत आहे, यापेक्षा मला जनतेसाठी कसे चांगली कामे करता येतील,

विकास कामांनाच मी प्राधान्य देतो. जनतेच्या आशीर्वादावरच सर्व काही शक्य आहे. जनतेसाठी प्रामाणिक काम करत राहायचे, जनता साथ देत राहते असे मत खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

काष्टी येथे ते विविध विकास कामांचा शुभारंभ व साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास प्रतिभाताई पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, भगवान पाचपुते, अरुण पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे खासदार विखे म्हणाले की, ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये रस्त्यांसाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणला.

या वयातही इतक्या तत्परतेने तालुक्यात जनतेसाठी काम करणारा नेता पाहिला नाही. पाचपुतेंची जिद्द, चिकाटी व काम करण्याची पद्धत ही वेगळीच असल्याचे सांगितले.

२२ जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करावी.

सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची सकाळी प्रभातफेरी काढून रामनामाचा जयघोष करावा. तसेच सर्व घरांवर गुढ्या उभारून भगवे ध्वज फडकवावेत व दिवे लावावेत आणि महिला मंडळाच्या माध्यमातून सामूहिक रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्याचे आवाहन खा. विखेंनी जनतेला केले.

याप्रसंगी भगवान पाचपुते, डॉ. प्रतिभा पाचपुते, वैभव पाचपुते, राजेंद्र पाचपुते, मोहनराव दांगट, सुनील दरेकर, मदनराव गडदे, सुवर्णाताई पाचपुते, बबनराव राहीज, कैलासराव गवते, अशोकराव गांगड, महेशराव दरेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here