अहमदनगर

Ahmednagar News: टेम्पो आडवून दोन मित्रांना धक्काबुक्की, शिवीगाळ; गुन्हा दाखल

टेम्पोमधून प्रवास करणार्‍या तिघांपैकी दोघा मित्रांना एकाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. मोबाईल फोडून नुकसान केले. अहमदनगर-मनमाड रोडवर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

या प्रकरणी आदित्य रमेश कांडेकर (वय 25 रा. पितळे कॉलनी, नागापूर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहन बाळासाहेेब कोल्हे (रा. वनराय कॉलनी, एमआयडीसी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी आदित्य कांडेकर, त्यांचा मित्र प्रतिक मनोहर साळवे व वाहन चालक बाबासाहेब गंगाधर भागवत यांनी आदित्य यांच्या टेम्पोतील माल भिंगार येथे खाली केला.

ते आदित्य यांच्या घरी नागापूर येथे जात असताना अहमदनगर-मनमाड रोडवरील यमहा शोरूम समोर रोहन कोल्हे टेम्पोला आडवा झाला.

त्याने टेम्पो थांबून आदित्य व त्यांचा मित्र प्रतिक यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. आदित्य यांचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला. टॅमी हातात घेऊन,‘तुझ्याकडे बघून घेतो’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button