Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : अत्याचार करून शाळकरी मुलीचा खून

Ahmednagar News : अत्याचार करून शाळकरी मुलीचा खून

Ahmednagar News : देहरे (ता. नगर) येथील शाळकरी मुलीला शनिवारी (दि.१३) पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून मारहाण केली.

त्यानंतर विहिरीत ढकलून दिले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीसह दोघां- विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

गोट्या ऊर्फ ऋत्वीक संजय जाधव असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या मामाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत पीडित मुलीला शनिवारी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने एमआयडीसी पोलिसांत दिली होती.

दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी देहरे येथील एका विहिरीत आढळून आला. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच, त्यांनी नातेवाईकांनाही माहिती दिली. तिच्या अंगावर जखमा असल्याने मारहाण करून पीडित मुलीचा खून झाल्याचे उघड झाले.

नातेवाईकाने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, संशयित आरोपी गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव याचे दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते.

आरोपी ऋत्वीक जाधव हा मयत मुलीसोबतही बोलत होता. ही बाब त्या अल्पवयीन मुलीला खटकली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने मयत मुलीला मारहाण करून तिला जाधव वस्तीकडे नेले.

तिथे त्या अल्पवयीन मुलीने आरोपी गोट्या उर्फ ऋत्वीक जाधव याच्या मदतीने मयत मुलीच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून विहिरीत ढकलून देत तिचा खून केला. आरोपी गोट्याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला केला. पोलिसांनी अत्याचार, पोक्सो, अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

देहऱ्यात तणावपूर्ण शांतता

गेल्या दोन दिवसांपासून देहरे येथे पोलिसांचा बंदोबस्त होता. मयत मुलीचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले. बुधवारी दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे देहरे येथे तणावपूर्ण शांतता आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments