अहमदनगर

Ahmednagar News: ;सील केलेल्या मिळकतीवर ताबा; पती-पत्नीवर गुन्हा

फायनान्स कंपनी व नायब तहसीलदार यांनी सील केलेल्या मिळकतीचे सील तोडून उपभोग घेणार्‍या पती-पत्नीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वैभव अशोक वाघ (वय 26 रा. बुर्‍हाणनगर ता. नगर) यांनी फिर्याद दिली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 434, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहानबा लक्ष्मण जाधव व विमल लहानबा जाधव (दोघे रा. जाधव मळा, निमगाव वाघा, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीचे नावे आहेत. 6 मे रोजी ही घटना घडली असून शनिवार, 21 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाधिकारी व नगर तालुका तहसीलदार यांच्या आदेशान्वये एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड व नायब तहसीलदार यांनी जाधव यांची मिळकतीस सील लावले होते. जाधव यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सील तोडून मिळकतीचा उपभोग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे जाधव पती-पत्नीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button