Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नागवडेंचा जयंती सोहळा

अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नागवडेंचा जयंती सोहळा

Ahmednagar News : स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचा ९० वा जयंती सोहळा उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत

शुक्रवारी (दि. १९) दुपारी दोन वाजता नागवडे साखर कारखाना कार्यस्थळावरील हायस्कूलच्या पटांगणात आयोजित केल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या ९० व्या जयंती समारंभासाठी अजित पवार यांनी सुरुवातीस सकाळी ११ची वेळ दिली होती.

परंतु, त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर येथे सकाळी सभा आहे. त्या कार्यक्रमास पवार उपस्थित राहणार असल्याने येथील कार्यक्रमाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.

राजेंद्र नागवडे म्हणाले, बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी समक्ष चर्चा झाली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी २ वाजता पवार यांचे कारखाना कार्यस्थळावर हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.

स्व. बापूंच्या स्मृतिस्थळी जाऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इंदिरा गांधी विद्यानिकेतन हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित सभेस ते उपस्थित राहतील.

यावेळी राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार यांच्याकडे कुकडी डाव्या कालव्याच्या चालू आवर्तनातून विसापूर धरणात पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले. त्यानुसार त्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, युवक नेते दीपक नागवडे, संचालक मंडळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments