अहमदनगर

Ahmednagar News: दिवसा घर फोडले; आठ तोळे सोने, अर्धा किलो चांदी चोरली

चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करत तब्बल आठ तोळे सोने व अर्धा किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. केडगाव उपनगरात ही घटना घडली. पूजा मनोज बडे (वय 31 रा. भुषणनगर, केडगाव) यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी बडे या त्यांच्या दोन्ही मुलांसह मांढरदेवी व जेजुरी येथे त्यांच्या आई वडिलांसह गेले होते. त्यांचे पती मनोज हे घर बंद करून कोपरगाव येथे मार्केटींगच्या कामानिमीत्त गेले. ते कोपरगावहून घरी परत आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधील आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 600 ग्रॅम चांदीचे दागिने व तीन हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे.

तसेच आरोपींच्या शोधार्थ दोन पथके पाठविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button