अहमदनगर
पतीचा पत्नीवर संशय; पतीने केली….

पत्नीवर वारंवार संशय घेत पतीने तिच्यासह मुलीला अश्लिल शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पत्नी शिला शिवाजी शिनगान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती शिवाजी रावसाहेब शिनगान (रा. लोंढे मळा, केडगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी हा शिलावर नेहमी संशय घेत असे. 14 एप्रिल रोजी सायंकाळी शिला घरी असताना शिवाजी दारू पिऊन आला व त्यांना म्हणाला,‘तू माझ्या विरूध्द तक्रार का दिली होती’,
असे म्हणत शिवीगाळ करून शिला व त्यांच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. घाबरलेली शिला तिच्या बहिणीकडे निघून गेली. तीने मंगळवारी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी तिचा पती शिवाजीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.