अहमदनगर

Ahmednagar News : ट्रक- दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmednagar News; ट्रक दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सचिन दिनकर जगताप (वय 33 रा. शिराढोण ता. नगर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अहमदनगर-सोलापूर रोडवर टोल नाक्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सचिन जगताप त्यांच्याकडील दुचाकीवरून सोलापूर रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. अपघातात जखमी झालेल्या सचिन जगताप

यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button