अहमदनगरलेटेस्ट

Ahmednagar News | पुणे-नगर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

Ahmednagar News :- भरधाव वेगात जाणार्‍या मालवाहू टेम्पोने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुपा ते वाळवणे रोडवर बुधवारी (दि. 4) रात्री घडली.

रोहिदास यशवंत थोरात (वय 70, रा. वाळवणे, ता. पारनेर) असे या अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत थोरात हे हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरून सुप्याहून पुणे – अहमदनगर महामार्गावरून वाळवणे गावाकडे जात असताना वाळवणेकडून सुप्याच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोने खिंडीजवळ मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली. .

या अपघातात थोरात हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. याबाबत सुरेश रावसाहेब थोरात (रा. वाळवणे, ता. पारनेर) यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी टेम्पो चालक आनंद बाळासाहेब वरकड (रा. देऊळगावसिद्धी, ता. अहमदनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button