Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : निळवंडेच्या उजव्या कालव्यास 'या' तारखेपासून पाणी सोडणार ! मंत्री...

Ahmednagar News : निळवंडेच्या उजव्या कालव्यास ‘या’ तारखेपासून पाणी सोडणार ! मंत्री राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती

Ahmednagar News: निळवंडे धरण हे उत्तरेसाठी जीवनदायिनी आहे. सध्या निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी कधीही सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता उद्या अर्थात २२ जानेवारीला निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला २२ जानेवारीला पाणी सोडण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, आयोध्येमध्ये भक्तीमय वातावरणात असलेला मंदिर लोकार्पण सोहळा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

संपूर्ण देश आता राममय झाला असून रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले. या ऐतिहासिक क्षणामुळे लाखो हिंदूचे स्वप्न पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील आणि भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पर्व ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे देश आज मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वगुरू बनण्याच्या संकल्पावर यशस्वी वाटचाल करत आहे. जगातील तिसरी मजबूत अर्थव्यवस्था म्हणून भारत देशाची ओळख आता जगामध्ये निर्माण होत असल्याचेही विखे यांनी संगितले. राम मंदिर निर्माणाचा आनंदोत्सव साजरा होत असताना या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुण काँग्रेस पक्षाने लाखो रामभक्तांचा अपमान केला,

प्रभू श्रीरामांबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्या व्यक्तीचा संगमनेरमध्ये सत्कार होतो, याचा त्यांनी निषेध केला. ते पुढे म्हणाले, हिंदू निर्णयाला विरोध करण्याची भूमिका देशामध्ये जाणीवपुर्वक सुरू आहे. मात्र, आयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती करताना मुस्लिम समाजाच्या प्रार्थणा स्थळाची उभारणी करण्याचे कामही पंतप्रधान मोदी करू शकतात असेही ते म्हणाले आहेत.

शिवरायांच्या स्मारकासाठी १ कोटीचा निधी

संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली. त्यानुसार नियोजन करा असेही ते म्हणाले.

६ महिन्यात संगमनेर बसस्थानक परिसरात पुतळा उभारू असे आश्वासन देत विखे पाटील यांनी मारुती मंदीर सभामंडपाच्या निधीलाही मान्यता दिल्याची माहिती यावेळी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील असून जागा उपलब्ध करून द्या असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments