अहमदनगरलेटेस्ट

Ahmednagar Police Crime | वीस हजारांची लाच घेताना हवालदार अटकेत

Ahmednagar Police Crime : एका ग्रामस्थाविरूद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदारास पकडण्यात आले.

अण्णासाहेब बाबुराव चव्हाण (वय ५२) असे त्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो कर्जत पोलिस स्टेशन अंतर्गत राशीन दूरक्षेत्र येथे नियुक्तीला आहे. भांबोरा येथील एका ग्रामस्थाविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.

त्यामध्ये मदत करण्यासाठी चव्हाण याने तीस हजार रुपयांची लाच मागितील होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये घेण्याचे ठरले. राशीनमधील एका हॉस्पिटलसमोर स्वीकारताना नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला अटक केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सापळा अधिकारी शरद गोर्डे, संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या म्हस्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button