Ahmednagar Politics : आ. बबनराव पाचपुते यांना ‘त्यांनी’च अडचणीत आणले !
रस्त्यांच्या बाबतीत कोणीच न पाहिलेले स्वप्न म्हणजे काष्टी जामखेड रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून एका तासात जामखेड काष्टी रस्त्याने आता जाता येईल. तालुक्याचा विकास हा आश्वासनांचा नसून डोळ्याने दिसणारा असल्याचे सांगितले.

Ahmednagar Politics :- श्रीगोंदा पक्षाच्या उभारणीत मोलाचे योगदान देत असताना ज्या पक्षाची महाराष्ट्रात पाळेमुळे रोवण्यासाठी आ. पाचपुते यांनी आपले आयुष्य खर्ची केले, त्याच पक्षानी त्यांना अडचणीत आणले. मात्र आ. बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या जीवावर सर्व संकटांवर मात करत तालुक्याच्या विकासात आघाडी घेतली, असे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त काष्टी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. विखे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याच्या विकास आराखड्यात ज्या चार पाच जणांनी योगदान दिले, त्यांच्यात आ. बबनराव पाचपुते यांचे नाव पुढे येते. आ. पाचपुते यांनी आपल्या माध्यमातून अनेकांना मोठे केले.
रस्त्यांच्या बाबतीत कोणीच न पाहिलेले स्वप्न म्हणजे काष्टी जामखेड रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून एका तासात जामखेड काष्टी रस्त्याने आता जाता येईल. तालुक्याचा विकास हा आश्वासनांचा नसून डोळ्याने दिसणारा असल्याचे सांगितले.
आ. पाचपुते यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वयोश्री योजना आणि दिव्यांग साहित्य वाटप केल्याचेही खा. विखे यांनी सांगितले.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रास्ताविकात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाना आधार देऊन त्यांचा स्वाभिमान वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
विखे कुटुंब तुमच्या बरोबर
राजकरण करीत असताना काही लोक फक्त अंत्यविधी, दशक्रिया, लग्न सोहळे, साखरपुडा, वर्ष श्राद्ध यासाठी दिवसदिवस घालवतात. मात्र मी तसे न करता दिल्लीत बसून कामे मंजूर करून घेतो आणि विकास कसा करता येईल याचे नियोजन करत असतो.
आम्ही भाजप बरोबर काम करत असून आमदार बबनराव पाचपुते यांच्या बरोबर आहोत काही झाले तरी पाचपुते यांच्या खांद्याला खांदा लावून विखे कुटुंब तुमच्या बरोबर असल्याचेही खा. सुजय विखे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केले. यावेळी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, डॉ. प्रतिभा पाचपुते, भगवानराव पाचपुते, अॅड.प्रतापसिंह पाचपुते, गौरी शुगरचे चेअरमन बाबुराव बोत्रे, अरुण पाचपुते, बाळासाहेब महाडिक, मिलिंद दरेकर, सिद्धेश्वर देशमुख, सचिन कातोरे, गणेश झिटे, जिजाबापू शिंदे, बापूशेठ गोरे, संग्राम घोडके, अशोक खंडके, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस, अॅड. महेश दरेकर, भाजपचे शहर अध्यक्ष राजेंद्र ऊकांडे, श्रीकांत मगर, यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य सेवा संस्थेचे चेअरमन व संचालक, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.