अहमदनगर

Ahmednagar Politics । रोहित पवारांच्या मतदारसंघात येऊन शिवसेना खासदार बोलले असे काही !

राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार राज्यामध्ये महाविकास आघाडी तयार करण्यामध्ये आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा असून त्याची जान राजकारण करतांना ठेवण्याची गरज आहे.

आ. पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना व पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी.जिल्हा नियोजन समितीचा निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा.

त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.

यांनी आघाडीचा धर्म पाळावा, अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशारा शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर यांनी दिला.शिवसेनेचे शिव संपर्क अभियान टप्पा दोनचा शुभारंभ शनिवारी कर्जत येथे खा. कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी स्थानिक पदाधिकारी अमृत लिंगडे, सुभाष जाधव, पोपट धनवडे, शिवाजी नवले, दीपक गांगर्डे व मंगेश राऊत यांनी मतदारसंघामध्ये काम करतांना शिवसैनिकांची होत असलेली अडवणूकीबाबत तक्रारी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button