अहमदनगर

अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघातात नगर येथील व्यक्ती जागीच ठार !

अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा येथे हॉटेल लोकसेवा जवळ दुचाकीला ट्रकचा कट बसल्याने झालेल्या अपघातात नगर येथील व्यक्ती जागीच ठार झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान

सुपा येथील हॉटेल लोकसेवा समोर एक दुचाकीस्वार पुण्याच्या दिशेकडून नगरच्या दिशेने जात असताना

त्याच वेळी पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकची दुचाकीला

जोराचा धक्का लागला व दुचाकीस्वार पाच ते दहा फुट फरपटत पडले.

त्यावेळी तेथे असलेल्या लोकसेवा हॉटेलचे मालक अमोल पवार यांनी जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ मदत करत

स्वतःच्या गाडीतुन सुपा येथील सिम्स रुग्णालयात दाखल केले.

परंतु जखमी दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार व रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने सदर व्यक्ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button