अहमदनगर

अहमदनगर-पुणे महामार्ग ‘या’ दिवशी राहणार वाहतुकीसाठी बंद; कारण…

अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावरून पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक 31 डिसेंबर, 2022 रात्री 12 ते 2 जानेवारी, 2023 रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविणे आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

 

1 जानेवारी, 2023 रोजी भीमा कोरेगाव, पेरणे (ता. हवेली, जि. पुणे) येथे जयस्तंभ कार्यक्रम होणार असून सदर जयस्तंभास अभिवादन करण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होणार आहे. सदर कार्यक्रम हा अहमदनगर – पुणे महामार्गालगत असून कार्यक्रमाकरीता येणारे नागरीकांमुळे सदर महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होवून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

 

अहमदनगर – पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारी वाहतुक तसेच अहमदनगरकडुन सरळ पुणेकडे जाणारे सर्व प्रकारची वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश काढले आहे. अहमदनगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारे वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा-दैव दैठण-धावतगाव-पिंपरी कोळंडर-उक्कडगाव-बेलवंडी- अहमदनगर- दौड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ- मढेवडगाव- काष्टी- दौंड- सोलापुर- पुणे महामार्गामार्गे पुणेकडे वळविण्यात आली आहे.

 

अहमदनगरकडुन सरळ पुणेकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरीता कायनेटीक चौक- केडगाव बायपास-अरणगाव बायपास- कोळगाव – लोणी व्यंकनाथ- मढेवडगाव- काष्टी- दौड- सोलापुर- पुणे महामार्गामार्ग पुणेकडे वळविण्यात आली आहे. बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांनी उपरोक्त मार्गाचा अवलंब करावा. प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, जय स्तंभास अभिवादन करणेकामी जाणारे भाविकांची वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button