अहमदनगर

Ahmednagar Rain : जिल्ह्यात ह्या दिवशी पडणार पाऊस ? वाचा हवामान अंदाज

Ahmednagar Rain : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 एप्रिल आणि 22 एप्रिल या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे.

विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी 23 एप्रिलला देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 एप्रिल रोजी आकाश निरभ्र राहणार आहे. त्यावेळी कदाचित आपल्याला ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागतील.

विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. याशिवाय थंड वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशाप्रकारचा गारवा मिळत असल्याने त्या परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. पण ग्रामीण भागांमध्ये अशा वातावरणाता नागरिकांना फटका बसू शकतो. कारण शेतीचं नुकसाण होऊ शकतं.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 एप्रिल रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button