अहमदनगर हादरले ! विवाहित तरुणाची दरोडेखोरांकडून निर्घृण हत्या

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील एकलहरे-बेलापूर हमरस्त्यावर गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास दरोडा पडला असून यात विवाहित तरुणाची दरोडेखोरांनी निर्घृणपणे हत्या केली तर पत्नीला जबर मारहाण करून घरातील मोठी रक्कम घेऊन पोबारा केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कलहरे-बेलापूर रस्तावर नईम रशीद पठाण यांची शेतवस्ती असून तेथे नईम आपल्या पत्नीसह वास्तव्यास आहे. आज गुरुवारी 1 ते 2 च्या सुमारास नईम याची पत्नी लघुशंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात जाण्यासाठी घरातील दार उघडताच बाहेर टक लावून असलेले 4 पुरुष 1 महिला दरोडेखोरांनी नईम याच्या पत्नीला फरफटत घरात आणून जबर मारहाण करायला सुरुवात केली.
आरडाओरडा होताच नईमने दरोडेखोर घरात आल्याचे पाहिले. तोपर्यंत लगेचच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळांची झोकेची ओढणी गळ्याला बांधून निर्घृणपणे हत्या केली व घरातील मोठी रक्कम दरोडेखोरांनी घेऊन पोबारा केला आहे.
घटनेची माहिती जखमी पत्नी बुशरा हिने एकलहरे गावातील वास्तव्यास असलेल्या आपल्या वडिलांना देताच गावांतील सरपंच पतीसह घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती.
नईम पठाण याचा बेलापूर येथे बॅटरीचा व्यवसाय आहे. जागेचा व्यवहारासाठी काल नईमने 5 ते 6 लाख रुपये घरात आणले होते. याची सखोल माहिती दरोडेखोरांना मिळाली असल्याने संपुर्ण नियोजनपूर्व सदर दरोडा दरोडेखोरांनी टाकला आहे. तसेच दरोडेखोर हे स्थानिक असल्याचा संशय असून मृत नईमने दरोडेखोरांना ओळखले असल्यानेच नईमची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे.