अहमदनगर

मशिदीवरच्या भोंग्यांवरून अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मशिदींवरील भोंगे आणि त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतेलली भूमिका याची गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

आता राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असून त्यामुळे या चर्चेला अजूनच उधाण आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

सांगलीमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत इशारा दिला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला म्हणे. घेतला असेल.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेतला, तर तो इतरही कार्यक्रमांना लागू होईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “शिर्डीला साईबाबांची काकड आरती पहाटे ५ वाजता सुरू होते.

उद्या त्यातही काही अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे प्रवचन, कीर्तन, हरिनाम सप्ताह असतो. हे सगळं रात्रीच आपल्या गावांमध्ये असतं. लाऊडस्पीकर चालू असतो.

जर एखादी गोष्ट सर्वांच्या संमतीने न त्रास होता होत असेल, तर नवीन प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय?” असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button