Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : अकोल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख मोरे राष्ट्रवादीत

Ahmednagar News : अकोल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख मोरे राष्ट्रवादीत

Ahmednagar News : अकोले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अकोले विधानसभा समन्वयक व माजी तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांच्यासह शेकडो तालुका पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आमदार डॉ. किरण लहामटे त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मोरे व समर्थकांनी शिवसेनेत २१ वर्ष वाया गेल्याची जाहीर कबुली देत ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आमदार डॉ. लहामटे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी आपण शिवसेनेत शेवटपर्यंत निष्ठावंत होतो. तसेच माझ्यावर विश्वास असलेल्या पदाधिकाऱ्यांसह नरेंद्र भोर,

अविनाश देशमुख, सुनील गिन्हे, सुरेश साबळे, मच्छिंद्र राऊत, विठ्ठल भांगरे, भाऊराव भांगरे, आबा नाईकवाडी, मुश्ताक शेख, मच्छिंद्र बाळासाहेब नेहें, काँग्रेसचे उबेद शेख व इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी,

ईश्वर वाकचौरे, अक्षय आभाळे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वाती शेणकर, तालुकाध्यक्ष रोकडे आदी उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्ष स्वाती शेणकर यांनी आभार मानले.

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज मोरे यांनी मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला. मी त्यांच्यावर लवकरच जिल्ह्याची जबाबदारी देणार आहे.

त्याच्यासोबत अन्य पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असून त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सक्रीय काम करण्याचा निर्णय घेतला, असे आमदार लहामटे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments